

अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी विकसकाला स्वीकृती पत्र
‘६४१’ची सदनिका मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : म्हाडाने अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकास प्रकल्पाकरिता मे. एम.जी.एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा.लि., मे. एन.एन.पी. बिल्डकॉन प्रा.लि., मे. ओनेस्ट शेल्टर्स प्रा.लि. यांना संयुक्तपणे आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकृती पत्र देण्यात आले.
या पुनर्विकासाच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या २१० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या मोबदल्यात प्रत्येकी ६४१ चौरस फुटांची सदनिका पुनर्विकसित इमारतीत मिळणार आहे.
म्हाडामार्फत अभ्युदयनगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकसकाची नेमणूक करून विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत राबविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या २७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने ६ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. विकसक नेमण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
अभ्युदयनगर वसाहतीत ३३ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यःस्थितीत ४८ इमारती असून २०८ चौरस फूट आकारमानाच्या ३,४१० सदनिका आहेत. त्यामध्ये ३,३३५ निवासी सदनिका तसेच ७५ अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे. विकसकाला स्वीकृती पत्र देताना मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.