पश्चिम रेल्वेचा सोहळा उत्साहात

पश्चिम रेल्वेचा सोहळा उत्साहात
Published on

पश्चिम रेल्वेचा सोहळा उत्साहात

मुंबई, ता. ८ : पश्चिम रेल्वेचा ७१वा रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा शुक्रवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला. २०२५-२६ या वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभागांना आणि युनिट्सना पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडेय यांच्या हस्ते २८ कार्यक्षमता सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली.
यंदाच्या सोहळ्यात महाव्यवस्थापकांचा सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता सन्मान मुंबई सेंट्रल आणि रतलाम विभागाने संयुक्तपणे पटकावला. तर सर्वोत्कृष्ट सुधारणा सन्मानचिन्ह राजकोट विभागाला प्रदान करण्यात आले. मुंबई सेंट्रल विभागाने विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ऊर्जा बचत आणि कार्यक्षम कामगिरीबद्दलचा ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार तसेच कार्मिक सन्मानचिन्ह मुंबई सेंट्रल विभागाला मिळाले. याशिवाय लेव्हल क्रॉसिंग हटविणे आणि रस्ता सुरक्षा उपाययोजनांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा आंतर-विभागीय पुरस्कारही विभागाने पटकावला. रोलिंग स्टॉक सन्मानचिन्ह मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद विभागाला संयुक्तपणे देण्यात आले. तर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे सुरक्षा सन्मानचिन्ह मुंबई सेंट्रल आणि वडोदरा विभागाने संयुक्तपणे जिंकले.
...
‘जनसंपर्क’ला स्वतंत्र पुरस्कार
पश्चिम रेल्वेने यंदा प्रथमच जनसंपर्क क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केला. हा सन्मान अहमदाबाद विभागाने पटकावला. अहमदाबाद विभागाने सर्वोत्कृष्ट लोडिंग प्रयत्न पुरस्कारही मिळवला. तसेच परिचालन क्षेत्रातील ढाल रतलाम विभागासोबत संयुक्तपणे जिंकली. याशिवाय अहमदाबाद विभागातील पालनपूर येथील रनिंग रूमला सर्वोत्कृष्ट देखभाल असलेली रनिंग रूम म्हणून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com