आज मुंबईत आर. बी. मोरे चरित्राचे प्रकाशन

आज मुंबईत आर. बी. मोरे चरित्राचे प्रकाशन
Published on

मुंबई, ता. १० : महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष व ११ मे रोजी कॉ. आर. बी. मोरे स्मृतिदिनानिमित्त सत्येंद्र मोरे, सुबोध मोरे लिखित, या सत्याग्रहाचे प्रमुख संघटक कॉम्रेड आर. बी. मोरे यांच्यावरील, ‘निळ्या आकाशातील, लाल तारा : कॉम्रेड आर. बी. मोरे’ या अल्प चरित्राचे प्रकाशन जाती अंत संघर्ष समिती व प्रतिशब्द प्रकाशनातर्फे सोमवारी (ता. ११) संध्याकाळी ६ वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व येथे होणार आहे. या प्रकाशन व स्मृतिदिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व आंबेडकरी नेते अर्जुन डांगळे, सीटू कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड, जाती अंत संघर्ष समिती महाराष्ट्रचे निमंत्रक कॉ. शैलेंद्र कांबळे असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे संस्थापक व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार असतील, असे जाती अंत संघर्ष समिती व प्रतिशब्द प्रकाशनातर्फे सुबोध मोरे यांनी कळविले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com