मंत्री लोढा यांच्या पुत्राचे अवैध बांधकाम जमीनदोस्त

मंत्री लोढा यांच्या पुत्राचे अवैध बांधकाम जमीनदोस्त
Published on

मंत्री लोढा यांच्या पुत्राचे अवैध बांधकाम जमीनदोस्त
सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिनंदन लोढा यांच्याशी संबंधित असलेल्या ‘मुंबई माईल रिजनरेशन असोसिएशन’ या संस्थेने वरळी सी-फेस परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेले अवैध बांधकाम महापालिकेने अखेर जमीनदोस्त केले आहे.
कोस्टल रेग्युलेशन झोनच्या (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम उभारण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याप्रकरणी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. ​वरळी सी-फेस परिसरातील सार्वजनिक शौचालय, उद्यान आणि रोड डिव्हायडरचे सुशोभीकरण करण्यासाठी ‘मुंबई माईल’ या संस्थेने महापालिकेकडून परवानगी मागितली होती. महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाने २४ जून २०२५ रोजी काही अटी व शर्तींच्या अधीन राहून ही परवानगी दिली होती. मात्र, सुशोभीकरणाच्या नावाखाली या संस्थेने आवश्यक असलेली ‘सीआरझेड’ ना-हरकत प्रमाणपत्र न घेताच शौचालयाचे बांधकाम सुरू केले. ​या अवैध बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती.
...
माहिती नसल्याचा दावा
महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी तक्रारीची दखल घेत या संस्थेला नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर संस्थेने ‘आम्हाला सीआरझेड परवानगीची माहिती नव्हती, असे उत्तर दिले, जे प्रशासनाने फेटाळून लावले. अटींचे उल्लंघन केल्यामुळे सुशोभीकरणासाठी दिलेली मूळ परवानगी प्रशासनाने रद्द करून कारवाई सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com