

गुंतवणूकदारांची ११ कोटींची फसवणूक
वार्षिक ६० टक्के परताव्याचे प्रलोभन
मुंबई, ता. १० ः परकीय आणि आभासी चलनात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवत १००हून अधिक गुंतवणूकदारांना तब्बल ११ कोटी रुपयांना फसवणाऱ्या लाविश चौधरी ऊर्फ नवाब अली या व्यक्तीसह क्यूएफएक्स ट्रेड, यॉर्कर एफएक्स आदी कंपन्यांच्या प्रवर्तक, भागीदारांविरोधात माटुंगा पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवला.
दुचाकीचे सुटे भाग अन्य देशांतून आयात करून भारतीय बाजारपेठेत विकणारे व्यावसायिक राहुल घोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. ऑगस्ट २०२२मध्ये घोले यांनी पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित मनी एक्स्पोत हजेरी लावली होती. तेथे आरोपी चौधरीने क्यूएफएक्स कंपनीतर्फे परकीय चलन, आभासी चलनातील गुंतवणुकीद्वारे अधिकाधिक नफा कसा कमावता येईल, अशी माहिती दिली. त्याने आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास वार्षिक ६० टक्के परतावा देऊ, असे प्रलोभन दाखवले. आरोपी चौधरीने सांगितलेल्या योजनेवर घोले यांच्या विश्वास बसला. गुंतवणुकीस तयार होताच चौधरीने यॉर्कर कंपनीत त्यांची नोंदणी करून घेतली. त्यांचे खाते सुरू केले. या आभासी खात्यावर भारतीय चलनात केलेली गुंतवणूक अमेरिकन डॉलरमध्ये दिसत होती. घोले यांनी सुरुवातीला आठ लाख रुपये गुंतवले. त्यावर दरमहा पाच टक्के परतावा सुरू झाला. त्यामुळे घोले यांनी कुटुंबीय, मित्रपरिवारास या योजनेबद्दल सांगितले. परिचितांकडून त्यांनी सुमारे ५५ लाखांची गुंतवणूक चौधरीकडे केली.
...
परतावा बंद झाल्याने...
घोले आणि त्यांच्या परिचितांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत नियमित परतावा मिळत होता; मात्र त्यानंतर तो अचानक बंद झाला. शिवाय चौधरीशी संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदारांनी चौकशी सुरू केली तेव्हा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौधरीविरोधात कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात कारवाई केल्याची माहिती पुढे आली. तेव्हा आपलीही फसवणूक झाल्याचे घोले आणि अन्य गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.