

रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना वेग येणार
एसआरए प्राधिकरण काढून घेतलेल्या १५० प्रकल्पांसाठी नवे विकसक नेमणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वर्षानुवर्षे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडवणारे विकसक एसआरए प्राधिकरणाच्या रडारवर आले असून, त्यांच्याकडे असलेले प्रकल्प काढून घेत त्यांना बेदखल केले आहे. त्यानंतर आता हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरए प्राधिकरण संबंधित रहिवाशांच्या मदतीने नवीन विकसक नेमणार आहे. त्यामुळे रखडलेल्या सदर प्रकल्पांना वेग येणार आहे.
मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र, अनेक विकसकांनी प्रकल्प घेतले असून, त्या ठिकाणच्या झोपड्या तोडल्या आहेत. त्यामुळे संबंधित रहिवासी बेघर झालेले असतानाही संबंधित विकासक प्रकल्प पूर्ण करताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी निधीची चणचण असल्याचे दिसत असून, सदरचे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत एसआरएकडून नोटीस पाठवली असता कोणताच प्रतिसाद देत नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करून रहिवाशांना घरे मिळावीत म्हणून एसआरएने कायदेशीर कारवाई करत १३/२ अंतर्गत जवळपास १५० पुनर्वसन प्रकल्प ताब्यात घेतले आहेत.
आठ-दहा वर्षांहून अधिक काळापासून पुनर्वसन प्रकल्प लटकून ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकल्पासाठी नवीन विकसकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
केलेल्या कामाचे मूल्यांकन होणार
उपनगरातील रखडलेल्या काही प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपाचे काम झाले आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्यासाठी संबंधित विकासकाने कोर्टात दावा केल्यास प्रकल्पाला आणखी विलंब होऊ शकतो. त्यामुळे ज्या प्रकल्पाचे काही अंशी काम झाले आहे, त्याचे मूल्यांकन करून संबंधिताला त्याची भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विकसकाने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.