

मुंबईत ६.५ कोटींचे हेरॉईन जप्त
बिहार, उत्तराखंडातील तिघांना अटक
मुंबई, ता. ११ : अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत आलेले तब्बल ६.५ कोटींचे हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केले आहे. दाेन स्वतंत्र कारवाईत बिहार आणि उत्तराखंडातील तिघांना अटक केली आहे. उत्तर भारतातून हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पोलिस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत जगदाळे आणि पथकाने १ मे आणि रविवारी दोन स्वतंत्र कारवायांत राजस्थान, उत्तराखंड येथून मुंबई आलेल्या हेरॉईनच्या दोन खेपा जप्त केल्या.
पहिल्या कारवाईत पथकाला सांताक्रूझ परिसरात एक संशयास्पद व्यक्ती आढळला. झाडाझडतीनंतर त्याच्याकडून ५०८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २.५४ कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले. दुसरी कारवाई रविवारी वर्सोवा परिसरात करण्यात आली. मध्यरात्री वर्सोवा परिसरात हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या अरमान मलिक आणि दानिश अली या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक ग्रॅम हेरॉईन बांधलेल्या कागदी पुड्या आढळल्या. चौकशीत उर्वरित साठा वर्सोवा परिसरात भाड्याने घेतलेल्या खोलीत ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तेथे झाडाझडती घेतली असता पाऊण किलो हेरॉईन सापडले. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३.८२ कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले.
भाड्याने घर घेऊन वितरण
हेरॉईनसह अटक झालेले तिन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांचे सदस्य असून ते उत्तरेकडील राजस्थान, उत्तराखंड राज्यांतील म्होरक्यांच्या सूचनेवरून मुंबईत हेरॉईन विक्री करतात. मुंबईत भाड्याने खोली घेऊन तेथे एक ग्रॅम हेरॉईनच्या पुड्या बांधतात. त्यानंतर म्होरक्यांच्या आदेशावरून त्या पुड्या ग्राहकांपर्यंत पोहाेचवतात. त्या बदल्यात त्यांना २५ ते ३० हजार रुपये पगार मिळताे.
----
पश्चिम उपनगरात विक्री
दोन्ही कारवायांत अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून त्यांनी हेराॅईनची पश्चिम उपनगरात अधिक विक्री केल्याची माहिती दिली. वांद्रे ते दहिसर भागात अधिक मागणी असल्याने आरोपींनी सांताक्रूझ, वर्सोवा भागात भाड्याने घरे घेतली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.