स्टॉल खरेदी-विक्रीचे पूर्वीचे हस्तांतरण धोरण सुरू करण्याची मागणी

स्टॉल खरेदी-विक्रीचे पूर्वीचे हस्तांतरण धोरण सुरू करण्याची मागणी
Published on

स्टॉल खरेदी-विक्रीचे पूर्वीचे हस्तांतरण धोरण सुरू करण्याची मागणी

कुलाबा, ता. १२ ः मुंबई शहरातील मुंबई महापालिका परवाना स्टॉलच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीचे हस्तांतरण धोरण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी स्टॉलधारकांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील विविध धर्मीय समाजातील नागरिकांनी महापालिकेकडून परवाना स्टॉल घेतले असून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह या स्टॉलवर चालतो. काही स्टॉलधारकांनी वैयक्तिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांनी हे स्टॉल इतरांना विकले आहेत; मात्र सुमारे २०१२ पासून स्टॉल हस्तांतरण प्रक्रिया बंद असल्याने संबंधितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हस्तांतरण धोरण बंद असल्यामुळे हजारो स्टॉलधारकांची नावे नोंदणीत नसल्याने नातेवाईक किंवा अन्य व्यक्तीकडून मासिक भाडे व शुल्क स्वीकारले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही स्टॉल नातेवाइकांना देण्यात आले असले, तरी नावांत बदल न झाल्याने विविध विभागांतून दंड आकारला जात असल्याचेही स्टॉलधारकांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे जुने हस्तांतरण धोरण तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर रितू तावडे, पालिका आयुक्त तसेच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com