उपवर्गीकरण विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा

उपवर्गीकरण विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा
Published on

उपवर्गीकरण विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा
कुलाबा, ता. ११ ः उपवर्गीकरणाच्या विरोधात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईमध्ये राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती रिपब्लिकन युथ नेते नितीन मोरे यांनी दिली. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन नेते तानसेन भाई ननावरे, माजी आमदार बाबुराव माने व इतर नेते उपस्थित होते.
बदर समितीचा अहवाल गुलदस्त्यात आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागविणे बाकी आहे. बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आले. आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये वाद, संघर्ष उभा राहण्याची भीती सदर बैठकीत व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com