कसारा घाटात दोन दिवस विशेष ब्लॉक

कसारा घाटात दोन दिवस विशेष ब्लॉक
Published on

कसारा घाटात दोन दिवस विशेष ब्लॉक
लोकल सेवा अंशतः प्रभावित; ‘ओएचई’च्या कामासाठी पूर्वतयारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कसारा घाट विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) संदर्भातील अडथळे दूर करण्याच्या पूर्वतयारीसाठी मध्य रेल्वेकडून १२ आणि १३ मे रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कसारा मार्गावरील काही उपनगरी लोकल सेवा प्रभावित होणार असून, काही गाड्या आसनगावपर्यंतच धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून इगतपुरी-कसारादरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर १२ आणि १३ मे रोजी दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत प्रत्येकी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (ता. १४), शुक्रवारी (ता. १५) आणि शनिवारी (ता. १६) पहाटे ३ ते ५ या वेळेतही विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत कसारा मार्गावरील उपनगरी सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे सीएसएमटीहून दुपारी १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावतील, तर कसारा-सीएसएमटी दुपारी ३.३५, ४.१६ आणि सायंकाळी ५.०२ वाजताच्या या लोकल कसाऱ्याऐवजी आसनगावहून अनुक्रमे ४.१२, ४.५४ आणि ५.३९ वाजता सुटतील. ब्लॉकपूर्वी कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल. तर ब्लॉकनंतरची पहिली कसारा लोकल सायंकाळी ४.५० वाजता रवाना होईल. कसारा-सीएसएमटी मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता कसाऱ्यावरून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल सायंकाळी ६.१७ वाजता कसाऱ्यावरून रवाना होणार आहे.

सहकार्य करण्याचे आवाहन
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर या ब्लॉकचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. उशिराने धावणाऱ्या गाड्यांचे नियमन परिचालनाच्या सोयीनुसार करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com