

दंगलींच्या घटनांमध्ये
महाराष्ट्र बिहारच्याही पुढे
राज्यातील तरुणांवर सर्वाधिक गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः राजकीय-सामाजिक कारणांवरून जात, धर्म, भाषाआधारित हिंसक संघर्षाच्या घटनांमध्ये बिहारपेक्षा महाराष्ट्रातील अल्पवयीन तरुणांचा अधिक सहभाग असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून पुढे आले होते. २०२४ मध्ये देशात अल्पवयीन तरुणांकडून घडलेल्या दंगलीच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वाधिक १२.२८ टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत.
----
देशातील एकूण गुन्हे - २७,६४९
महाराष्ट्र - ३,३९७
बिहार- २,९४७
मध्य प्रदेश - २,९१४
---
चोरी, घरफोड्यातही आघाडी
एकूण गुन्ह्यांपैकी बेकायदा जमाव जमवणे, दंगल घडवणे, दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष निर्माण करणे, याबरोबरच अशी कृती आदी सामाजिक शांततेशी संबंधित गुन्ह्यांसोबत चोरी, खंडणी, दरोडा, घरफोड्यांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे.
---
२
हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, मारहाणीच्या गुन्ह्यात राज्याचे स्थान
---
३
महिला व बालकांविरोधी गुन्ह्यांत राज्याचे स्थान
----
१४,१८५ बालगुन्हेगार
२०२४ मध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात सर्वाधिक १४,१८५ बालगुन्हेगार होते. त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अल्पवयीन आरोपी पालकांसमवेत वास्तव्य करणारे होते, असे ब्युरोने नमूद केले आहे.
----
दंगलीचे ४० टक्के गुन्हे राज्यात
२०२४ मध्ये अल्पवयीन तरुणांचा सहभाग स्पष्ट असलेले दंगलीचे ७४८ गुन्हे संपूर्ण देशात नोंद झाले. त्यापैकी २९७ अर्थात ४० टक्के गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.