

मुंबई, ता. १२ : मुंबई महानगर प्रदेशात वेगाने शहरी परिवर्तन होत आहे. त्याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी स्वित्झर्लंडमधील बर्न येथील जागतिक आर्थिक मंचावर सादरीकरण केले. या वेळी मुखर्जी यांनी जागतिक शहरी विकास क्षेत्रातील वरिष्ठ धोरणकर्ते, संस्थात्मक भागीदार आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत विविध धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग घेतला.
स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे मुख्यालय असलेले जागतिक आर्थिक मंच हे सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी काम करणारी जगातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्था मानली जाते. मुंबईसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या महानगर प्रदेशांसाठी हे कार्य विशेष महत्त्वाचे मानले जाते. राहण्यायोग्य शहर या संकल्पनेवर आधारित झालेल्या चर्चेत डॉ. मुखर्जी यांनी पायाभूत सुविधा-आधारित महानगरी परिवर्तनातील एमएमआरडीएचा अनुभव मांडला. यानिमित्त डॉ. मुखर्जी यांनी जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अलाॅईस झ्वींगी यांच्यासोबत धोरणात्मक चर्चा केली. तसेच मुंबई भेटीचेही निमंत्रण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.