सलीम डोला गुन्हे शाखेच्या ताब्यात

सलीम डोला गुन्हे शाखेच्या ताब्यात
Published on

सलीम डोला गुन्हे शाखेच्या ताब्यात

मुंबई, ता. १२ : एमडी या रासायनिक अमली पदार्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संघटित साखळी चालवणारा म्होरक्या, आंतरराष्ट्रीय तस्कर सलीम डोला याचा मंगळवारी (ता. १२) गुन्हे शाखेने ताबा घेतला. प्रत्यार्पणानंतर केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) त्याला अटक केली होती. दिल्ली येथील मुख्यालयात त्याच्याकडे चौकशी सुरू होती.
सलीमला बुधवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाईल. गुन्हे शाखेने २०२४ मध्ये सांगली येथील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल २५३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. हा कारखाना उभारण्यापासून तयार एमडीची विक्री सलीमच्या गुंतवणूक व सूचनेनुसार सुरू होती, असे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून त्याच्याकडे चौकशी केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गुन्हे शाखेच्या पाठपुराव्यामुळे या आधी सलीमचा मुलगा ताहीर आणि अन्य साथीदारांना अरब अमिराती पोलिसांनी दुबई व अन्य शहरांतून अटक करत भारतात पाठवले. सलीमला तुर्कस्तानमध्ये अटक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com