पाकिस्तानी गुंड भट्टीच्या संपर्कातील तरुणांची चौकशी

पाकिस्तानी गुंड भट्टीच्या संपर्कातील तरुणांची चौकशी
Published on

पाकिस्तानी गुंड भट्टीच्या संपर्कातील तरुणांची चौकशी

एटीएसचे राज्यभर छापे; ५७ तरुणांची ओळख पटली

मुंबई, ता. १३ : दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांनंतर पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी समाजमाध्यमांद्वारे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांत कट्टरतावाद भिनवत आहे. त्यांच्याकडून देशविघातक कृत्ये, गंभीर गुन्हे घडवून आणण्यासाठी त्याची धडपड सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर छापेमारी करून भट्टीच्या संपर्कात असलेल्या ५७ तरुणांची ओळख पटवून त्यांचा ठावठिकाणा प्राप्त केला आहे.

भट्टीच्या हालचालींचा सुगावा लागताच एटीएसने युद्धपातळीवर झाडाझडती सुरू केली. बुधवारी मुंबईसह ठाणे (मिरा रोड), पालघर (नालासोपारा), पुणे, नाशिक, जळगाव अकोला, नांदेड, नागपूर आदी जिल्ह्यांतील ४० ठिकाणांवर एकाचवेळी छापे घालून संशयित तरुणांकडे चौकशी करण्यात आली. एटीएस प्रवक्त्याने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, भट्टी या तरुणांना समाजमाध्यमांद्वारे देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

बाबा सिद्दीकी हत्या ते घातपाताचे कट
पाकिस्तानच्या लाहोर शहरात संघटित गुन्हेगारी टोळी चालवणाऱ्या भट्टीचे नाव सर्वप्रथम मार्च २०२४मध्ये पंजाबच्या जालंधर येथे रोझर संधू या यूट्युबरच्या घराबाहेर ग्रेनेड हल्ल्याच्या निमित्ताने पुढे आले. त्याने समाजमाध्यमांवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
- मुंबईत घडलेल्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी जिशान अख्तर यास देशाबाहेर पसार होण्यास भट्टीने सहकार्य केल्याचा आरोप आहे.
- गेल्या आठवड्यात दिल्ली स्पेशल सेलने विविध राज्यांतून अटक केलेल्या नऊ संशयित दहशतवादीही भट्टीच्या संपर्कात होते.
- एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातून अटक केलेल्या दोन तरुणांनी दिल्ली आणि एनसीआरमधील गर्दीची ठिकाणे लक्ष्य करण्याचा कट आखला होता. हे तरुणही भट्टीच्या संपर्कात हाेते. याशिवाय अमृतसर येथील सौम्य तीव्रतेच्या स्फोटांमध्येही भट्टीचा हात असावा, असा संशय आहे.
------
आयएसआयचे बाहुले?
बिश्नोई टोळी ही भारत सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप कॅनडा सरकार वारंवार करत आहे. त्याप्रमाणेच भट्टी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या जोरावर, सूचनेनुसार भारतात आपली पाळेमुळे रुजवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com