

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मुंबई, ता. १३ ः अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली. पूर्व उपनगरात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोषणातून पीडित १३ वर्षीय मुलगी गरोदर झाली. सोमवारी तिला त्रास झाल्याने पालकांनी नजीकच्या रुग्णालयात नेले. तेथे ही बाब उघड होताच पालकांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने आरोपीचे अत्याचार उघड केले. पालकांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. जानेवारी ते मार्च या कालावधीत हत्येची धमकी देत अत्याचार केल्याचे मुलीने जबाबात सांगितले.