हिमोफिलीया उपचार व्यवस्थेला गती; ( भाग्यश्री मॅडम

हिमोफिलीया उपचार व्यवस्थेला गती; ( भाग्यश्री मॅडम
Published on

हिमोफिलिया उपचार व्यवस्थेला गती
तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : हिमोफिलिया रुग्णांचे ऑनलाइन पोर्टलद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचाराची अद्ययावत नोंद ठेवावी. तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एका महिन्याच्या आत हिमोफिलियासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील हिमोफिलिया रुग्णांवरील उपचारासंदर्भात आरोग्यसेवा आयुक्तालाय मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी मंत्री आबिटकर यांनी गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ, कर्नाटक यासह इतर राज्यात हिमोफिलियासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)च्या पीआयपी वार्षिक कार्यक्रम कृती आराखड्यात हिमोफिलिया आजारासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. राज्यात हिमोफिलिया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, राज्यात एकूण पाच हजार ४९७ हिमोफिलिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा गिरीश खापरे, आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच हिमोफिलिया सोसायटी या संस्थेचे प्रतिनिधी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-------------
आजाराला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न
या आजाराचे कमी तीव्र, मध्यम तीव्र आणि तीव्र असे वर्गीकरण असून, मध्यम व तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. या रुग्णांना तातडीने निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सामाईक डे-केअर सेंटर अद्ययावत करावीत. तसेच रुग्णांचा डाटा एकत्रित करून या आजाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com