

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यात अचानक बंद झालेल्या बाइकटॅक्सी सेवेमुळे लाखो मराठी तरुणांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही सेवा ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांना शहर सोडता न येता सन्मानजनक कमाई देणारा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे बाइकटॅक्सी बंदीबाबत हस्तक्षेप करा, अशी मागणी महाराष्ट्र बाइकटॅक्सी वेल्फेअर संघटनेचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष अमित गावडे यांनी पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रभरात १० ते १५ हजार चालक संघटनेशी जोडलेले आहेत. यापैकी अडीच हजार पुरुष आणि एक हजार महिला सक्रिय रायडर्स आहेत. एप्रिलच्या कायदेशीर मान्यतेमुळे हजारो बेरोजगार तरुणांना आशा मिळाली. महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, असे ते म्हणाले; मात्र अचानक बंदीमुळे कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. बहुतेक रायडर्स ग्रामीण परिसरातून येतात. सध्याच्या मोटरसायकलचे कर्ज फेडत असताना सव्वा लाख ते दोन लाखांची ईव्ही दुचाकी खरेदी त्यांना परवडत नाही. अनुदानित कर्ज, राज्य-समर्थित मदत आणि स्वयंरोजगार रायडर्ससाठी स्वतंत्र धोरणही आखण्यात यावे. नोंदणीकृत रायडर्ससाठी सुरक्षा नियमांसह सेवा पूर्ववत करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.