नालेसफाईच्या गुणवत्तेशी तडजोड नको : महापाैर

नालेसफाईच्या गुणवत्तेशी 
तडजोड नको : महापाैर
Published on

नालेसफाईच्या गुणवत्तेशी
तडजोड नको : महापाैर

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची महापौरांनी गुरुवारी (ता. १४) प्रत्यक्ष पाहणी केली. ‘कामातील गुणवत्तेत कोणतीही तफावत न ठेवता नालेसफाईचा वेग वाढवून ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करा,’ असे कडक निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

​पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव, जुहू, खार आणि वांद्रे परिसरातील नदी-नाल्यांची तसेच रस्तेकामांची महापाैरांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, स्थानिक नगरसेवक आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मालाडचा रामचंद्र नाला, ओशिवरा नदी, इर्ला नाला आणि गझधरबांध येथील एसएनडीटी नाल्याची महापौरांनी पाहणी केली. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवताना झाडांच्या बुंध्याभोवती मातीचे थर देऊन त्यांना पुरेसे पाणी मिळेल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. झाडांची मुळे उघडी पडणार नाहीत, याची दक्षता घेण्यासही त्यांनी बजावले.
खार येथील गझधरबांध उदंचन केंद्रातील संगणकीय प्रणाली आणि पूर नियंत्रण द्वारांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी आढावा घेतला. ​या पाहणी दौऱ्यात महापौरांनी मालाड येथील महाराणा प्रताप क्रीडांगणालाही भेट देऊन तेथील सोयीसुविधांचे कौतुक केले. मुंबईतील मोकळ्या भूखंडांवर अशाच प्रकारे क्रीडांगणे उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
---
अचानक भेट देणार!
मालवणी आणि एसएनडीटी नाल्यातील स्वच्छतेचा वेग वाढवण्याच्या सूचना देतानाच येथे पुन्हा अचानक भेटी (सरप्राइझ व्‍हिजिट) देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुहू येथील इर्ला नाल्याची संरक्षक भिंत ढासळल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com