

अमर महाल-तुर्भे जलबोगद्याचे काम सुरू
चेंबूर, मानखुर्दच्या पाणीपुरवठ्यावर सोमवारी परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः महापालिकेतर्फे अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशयदरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे येत्या सोमवारी (ता. १८) सकाळी १० ते रात्री १० या १२ तासांच्या कालावधीत ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. तर काही ठिकाणी तो कमी दाबाने होईल.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित परिसरातील नागरिकांना १८ ते २५ मे या सात दिवसांच्या कालावधीत पाणी गाळून व उकळून वापरण्याचे आवाहन केले आहे.
या भागांवर होणार परिणाम :
एम पूर्व विभाग :
एच.पी.सी.एल. रिफायनरी व वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी.ए.आर.सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल, बी.पी.सी.एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आर.सी.एफ. वसाहत, भारतनगर, जे प्लॉट, हशू अडवाणीनगर, आणिक गाव, एम.ई.सी.बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर.एन.ए. उद्यान, म्हाडा इमारती, रॉकलाइन, विष्णूनगर, व्हिडिओकॉन व एस.जी. केमिकल इमारती, प्रयागनगर, ओम गणेशनगर, राहुलनगर आणि अशोकनगर.
एम पश्चिम विभाग :
चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमननगर, भक्ती भवन, चिखलवाडी, समर्थनगर, बसंत पार्क, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरानगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, रामटेकडी, चेंबूर वसाहत, कोकणनगर, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मरवली चर्च, आर.सी. मार्ग, माहूल गाव, आंबापाडा, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, वडवली, शरदनगर, लक्ष्मीनगर, वाशी नाका, जिजामातानगर, पी. एल. लोखंडे मार्ग, रमाबाई वसाहत, छेडानगर यांसह बी.पी.टी., टाटा पॉवर आणि आर.सी.एफ.सारख्या औद्योगिक वसाहती.
पाणी उकळून वापरण्याच्या सूचना :
पाणीपुरवठा विस्कळित होण्यासोबतच, दुरुस्तीच्या कामामुळे जलवाहिन्यांमध्ये काही प्रमाणात अशुद्धता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एम पूर्व (प्रभाग १४६, १४७, १४८) आणि एम पश्चिम (प्रभाग १५४, १५५) मधील नागरिकांनी १८ ते २५ मे या काळात आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून प्यावे, असे पालिकेच्या जलअभियंता खात्यामार्फत कळवण्यात आले आहे.
जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.