पावसाळापूर्व कामांचा उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून आढावा; प्रभाग ५ मध्ये नालेसफाईची पाहणी :

पावसाळापूर्व कामांचा उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून आढावा; प्रभाग ५ मध्ये नालेसफाईची पाहणी :
Published on

उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून आढावा
पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना जलकोंडीचा सामना करावा लागू नये आणि सखल भागात पाणी साचण्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी महापालिकेने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये सुरू असलेल्या नालेसफाई आणि वृक्ष छाटणीच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

​पावसाळ्यात नाल्यांमध्ये गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. ही समस्या टाळण्यासाठी सध्या यंत्रांच्या सहाय्याने नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपमहापौरांनी या कामाच्या दर्जाची पाहणी करून गाळ काढण्यासोबतच त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच, मॉन्सूनमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळून होणारी जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी रस्त्यांवरील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे कामही या वेळी त्यांच्या उपस्थितीत पार पडले.

हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई
​उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, ‘‘नागरिकांची सुरक्षा आणि प्रभागाचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाले मोकळे होतील. धोकादायक झाडांचा प्रश्न सुटेल याकडे आमचे बारीक लक्ष आहे. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.’’ ​या पाहणी दौऱ्यात उपमहापौरांसोबत पर्जन्य जलवाहिनी विभाग, उद्यान विभाग आणि महापालिकेचे अन्य संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com