

शुल्काची माहिती
दर्शनी भागात लावा
चंद्रकांत पाटील यांचे आदेश
मुंबई, ता. १५ : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सर्व महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेशशुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात सूचनाफलकावर लावणे अनिवार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेशशुल्काबाबत संपूर्ण माहिती शुल्कासहित महाविद्यालयाच्या प्रवेश माहितीपुस्तिकेत आवश्यक असलेल्या भागात नमूद करणे बंधनकारक आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत दिसण्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांच्यावर राहणार आहे, असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.