

नायगाव स्थानकावर आज मध्यरात्री मेगा ब्लॉक
पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगमुळे लोकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पश्चिम रेल्वेकडून नायगाव स्थानकावर पादचारी पुलाच्या दोन स्पॅनचे गर्डर टाकण्यासाठी आज (शनिवारी) मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरी तसेच काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, काही गाड्या रद्द, तर काही विलंबाने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत, तर अप-डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री २.३० ते ३.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सर्व जलद लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या भाईंदर ते वसई रोडदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. काही उपनगरी फेऱ्या रद्द राहणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
- मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम
ब्लॉकचा परिणाम काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. १७ मे १९००३ दादर-भुसावळ खानदेश एक्स्प्रेस बोरिवलीहून सुटेल, तर १६ मे २२९४६ ओखा-दादर सौराष्ट्र मेल सुमारे दोन तास १५ मिनिटे विलंबाने धावून बोरिवलीपर्यंतच धावणार आहे. याशिवाय ०९०५२ भुसावळ-दादर विशेष, १२९२८ एकता नगर-दादर एक्स्प्रेस, १४७०७ हनुमानगड-दादर एक्स्प्रेस आणि २२९५३ गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्याही विलंबाने धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.