हेल्पलाईनमुळे तीन लाखांचे दागिने परत

हेल्पलाईनमुळे तीन लाखांचे दागिने परत
Published on

हेल्पलाइनमुळे तीन लाखांचे दागिने परत

मुंबई, ता. २२ ः रेल्वे पोलिस हेल्पलाइनवर (१५१२) आलेल्या फोनच्या आधारे चर्चगेट रेल्वे पोलिसांनी लोकलमध्ये विसरलेली बॅग शोधून, त्यातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर साहित्य संबंधित प्रवाशाला परत केले. चर्नी रोड रेल्वे स्थानकावरील पोलिस शिपाई अहिरे यांना रविवारी दुपारी रेल्वे पोलिस हेल्पलाइनकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या महिला डब्यात काळ्या रंगाची बॅग विसरल्याची माहिती मिळाली. बॅगेत दागिने असल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर अहिरे यांनी संबंधित डब्यातून बॅग ताब्यात घेतली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत बॅग उघडून पाहिली असता, त्यात दागिने तसेच इतर साहित्य आढळले. त्याची किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हेल्पलाइनच्या माहितीनुसार संंबंधित बॅग विरार पूर्व येथील सोनल गायकवाड यांची असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना चर्नी रोड रेल्वे पोलिस चौकीत बोलावण्यात आले आणि बॅगसह सर्व साहित्य सुपूर्द करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com