दवाखान्यातील रांगेवरून रुग्णांमध्ये हाणामारी

दवाखान्यातील रांगेवरून 
रुग्णांमध्ये हाणामारी
Published on

दवाखान्यातील रांगेवरून
रुग्णांमध्ये हाणामारी

मुंबई, ता. २२ ः खासगी दवाखान्यात तपासणीसाठी रांग लावण्यावरून दोन रुग्णांमध्ये रविवारी वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने एका महिलेचे बोट फ्रॅक्चर झाल्याची घटना धारावी परिसरात घडली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इस्तियाक सिद्दीकी आणि आशिया सिद्दीकी अशी आरोपींची नावे आहेत.
धारावीच्या सुभाषनगर येथील मीना सोनवणे (वय ४६) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या बहीण पार्वती (४३) यांच्यासोबत रविवारी नजीकच्या एका खासगी दवाखान्यात आल्या. तपासणीसाठी नंबर लावल्यानंतर मागाहून आलेल्या आशिया या पुढे येऊन बसल्या. मीना यांनी जाब विचारताच आशिया यांनी शिवीगाळ करीत वाद घातला आणि पतीसह त्यांना मारहाण सुरू केली. या गडबडीत मीना यांचे मंगळसूत्र तुटले, तर पार्वती यांचे बोट फ्रॅक्चर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com