

महापालिका अधिकाऱ्याला अरेरावीची भाषा भोवली
निलंबनाचा ठराव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई पब्लिक स्कूल (लिबर्टी गार्डन) येथील उद्घाटन समारंभात राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि लोकप्रतिनिधींशी अरेरावीच्या भाषेत बोलल्याप्रकरणी महापालिकेचे राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत लाळगे यांना निलंबित करण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबई पब्लिक स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमातील राजशिष्टाचार उल्लंघनाचा आणि हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. उद्घाटन समारंभाच्या कोनशिलेवरून स्थानिक नगरसेवकाचे नाव वगळण्यात आल्याबाबत तिवाना यांनी राजशिष्टाचार विभागाला जाब विचारला. यावर उत्तर देताना राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांनी ‘सो व्हॉट?’ (तर मग काय?) असे म्हणत उद्दामपणाची भूमिका घेतली. अधिकाऱ्याच्या या अरेरावीच्या वर्तनावर नगरसेवक तिवाना यांनी विधी समितीच्या बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवला. ‘राजशिष्टाचार अधिकाऱ्यांनाच आधी शिष्टाचार शिकवण्याची गरज आहे,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. ‘हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा किंवा पदाचा नसून लोकशाही संस्थांचा सन्मान, स्थानिक लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि महापालिका प्रशासनाच्या निःपक्षतेचा आहे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे तिवाना यांनी व्यक्त केले.
...
अरेरावीचा तीव्र निषेध
विधी समितीच्या सदस्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासकीय अरेरावीचा तीव्र निषेध केला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच चौकशी प्रक्रियेवर संबंधित अधिकाऱ्याचा कोणताही प्रभाव पडू नये, या उद्देशाने राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांना चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्याचा ठराव विधी समितीने एकमताने मंजूर केला.
...
असे प्रकार वाढतील!
महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिवाना यांच्यासह कोणीही नगरसेवक ऐकण्यास तयार नव्हते. अशा अधिकाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे; अन्यथा दिवसेंदिवस असे प्रकार वाढत जातील, अशी भीतीही विधी समितीच्या सदस्यांनी या वेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.