मानवाधिकार आयोगाची पालिका, पोलिसांना नोटीस

मानवाधिकार आयोगाची 
पालिका, पोलिसांना नोटीस
Published on

मानवाधिकार आयोगाची
पालिका, पोलिसांना नोटीस
बनावट एमएमसी प्रमाणपत्र प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२२ : मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बनावट महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नोंदणी प्रमाणपत्राद्वारे डॉक्टर म्हणून नियुक्ती झाल्याची मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने पालिका आयुक्त तसेच पोलिस उपायुक्तांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये बनावट एमएमसी प्रमाणपत्राच्या आधारे काही डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याबाबत समोर आले. या प्रकरणात भरत सावंत नामक व्यक्ती ‘साई संजीवनी पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होम’ या कंत्राटी संस्थेमार्फत व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये कार्यरत होती. यापूर्वी त्याने भगवती रुग्णालय तसेच जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयातही काम केले होते. या संदर्भात ॲड. तुषार भोसले यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार भरत सावंत याच्याकडे वैध एमएमसी नोंदणी नसल्याचे उघड झाल्यानंतर त्याला व्ही. एन. देसाई रुग्णालयात काम करण्यास मज्जाव करण्यात आला होता; मात्र काही काळानंतर त्याने जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात पुन्हा काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट एमएमसी नोंदणीचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही वाय. एस. एन. चंद्रशेखर आणि राहुल यादव यांच्याविरोधात अशाच प्रकारचे आरोप समोर आले होते.
----
जबाबदारी पालिकेची नाही
पालिकेकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. मयूरा नागले यांनी लेखी उत्तरात संबंधित डॉक्टरचे एमएमसी प्रमाणपत्र वैध नसल्याचे मान्य केले होते; मात्र संबंधित व्यक्तीची नियुक्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आल्याने त्याची जबाबदारी पालिकेची नसल्याचेही त्यांनी नमूद केले होते, असे ॲड. भोसले यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com