आयआयटीतील बिबट्याच्या शोधासाठी रात्रीची गस्त सुरू

आयआयटीतील बिबट्याच्या 
शोधासाठी रात्रीची गस्त सुरू
Published on

आयआयटीतील बिबट्याच्या
शोधासाठी रात्रीची गस्त सुरू

​मुंबई, ता. २२ ः आयआयटी मुंबईतील एका इमारतीच्या लॉबीत शिरून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने ‘रॉ’ या वन्यजीव संस्थेच्या मदतीने कॅम्पसमध्ये दोनदिवसीय विशेष सर्वेक्षण आणि वन्यजीव नियंत्रण मोहीम राबवली. तसेच रात्रीची गस्त सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. परिसरात पुरेसे दिवे लावणे, अनावश्यक झाडी-झुडपे साफ करणे आणि इमारतींना ग्रील्स व सुरक्षा दरवाजे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स बसवण्यात आले. तसेच सुरक्षेसाठी वन विभागाने रोज रात्रीची गस्त सुरू केली आहे. कॅम्पसमधील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांशी चर्चा करून वन विभागाने त्यांच्या शंकांचे निरसन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com