

बेस्टच्या बस पासची मुदत वाढवा!
मुंबई, ता. २३ : नुकत्याच झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकर प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, याची भरपाई म्हणून मासिक बस पासधारकांना पासाच्या वैधतेमध्ये तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी बेस्ट उपक्रमाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वाहतूक/प्रवर्तन) रमेश मनोहर मडावी यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. मुंबईत १९ जून ते २१ जून २०२६ दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईतील बससेवा पूर्णपणे कोलमडली होती. अनेक नियमित प्रवाशांनी पैसे मोजून बेस्टचे मासिक बस पास काढले आहेत, मात्र बस पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना या सुविधेचा कोणताही लाभ घेता आला नाही. या मुदतवाढीमुळे प्रवाशांना त्यांच्या पासचा सुयोग्य वापर करता येईल आणि बेस्ट उपक्रमाप्रति सर्वसामान्य मुंबईकरांचा विश्वास कायम राहील, असेही विश्वासराव यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
काय आहे पत्रात?
तृष्णा विश्वासराव यांनी पत्रात नमूद केले आहे, की मुंबईकर नागरिक हे बेस्ट उपक्रमाचे प्रामाणिक आणि नियमित प्रवासी आहेत. संपामुळे सलग तीन दिवस त्यांना पासचा वापर करता आला नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व वैध बस पासधारकांना किमान तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.