अकरावी प्रवेशाला इंटिग्रेटेडचा फास?

अकरावी प्रवेशाला इंटिग्रेटेडचा फास?
Published on

अकरावी प्रवेशाला इंटिग्रेटेडचा फास?
तिसऱ्या फेरीत निम्म्यांहून अधिक जागा रिक्त; आता ‘ओपन फॉर ऑल’ची तयारी
मुंबई, ता. २३ ः अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. त्यात मुंबई विभागातून अर्ज केलेल्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश अलोटच झालेले नाही. प्रवेश फेऱ्या झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी क्लासचालकांचे हित साधण्यासाठी हव्या त्या पद्धतीने प्रवेश देता यावेत, यासाठीच या जागा रिक्त ठेवण्यात आल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया इंटिग्रेटेच्या तावडीत अडकली काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अकरावीच्या तिसऱ्या फेरीत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. या जागेवरील आरक्षणाचा विचार न करता शिक्षण विभागाकडून खासगी क्लास आणि महाविद्यालयांच्या हितासाठी ‘ओपन फॉर ऑल’ची फेरी राबवली जाणार आहे. या फेरीत राखीव जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध केला जातात. त्यासाठी न्यायालयाने दिलेले आदेश पायदळी तुडवले जातात; परंतु याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षण तज्ज्ञ आणि सिस्कॉमचे प्रमुख राजेंद्र धारणकर यांनी केला. रिक्त जागांपैकी आरक्षणाच्या एकाही जागांवर अन्याय होऊ नये, म्हणून त्या जागांचा आढावा घेतला जातो, परंतु त्याबाबत शिक्षण विभाग कोणतीच कार्यवाही करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-----
केवळ ६० हजार प्रवेश
अकरावीच्या तिसऱ्या फेरीत मुंबई विभागात अडीच लाखांहून अधिक जागा उपलब्ध होत्या; परंतु त्यासाठी केवळ १,२३,८८६ अर्ज आले. गुणवत्ता यादीत मात्र केवळ ६० हजार ७१५ विद्यार्थ्यांचेच प्रवेश अलोट झाले. त्यापैकी २७ हजार ५८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमांचे, ९,७६१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमांचे, तर ७,१९४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले. त्यामुळे अर्ज भरलेल्या तब्बल अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित का झाले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
----
अकरावी प्रवेशाची चौथी ‘ओपन टू ऑल’ घेतली जाईल. त्यात रिक्त राहिलेल्या जागांमध्ये राखीव जागांचा आढावा घेतला जाईल. पुढील फेरी केवळ मुलींसाठी आयोजित केली जाणार आहे. ‘इंटिग्रेटेड’द्वारे प्रवेश देणाऱ्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Online and Distance Learning Admissions Begin Get a Recognized Degree Without Leaving Your Job or Home
solapur
Engineering Admission
Students can complete document verification, fee payment and admission confirmation under the revised FYJC admission schedule.
Marathi News Esakal
www.esakal.com