

पोलिस भरतीत गुण वाढवून देण्याचे प्रलोभन
आर्थिक फसवणूक करणाऱ्या पोलिसासह चौघांवर गुन्हा
मुंबई, ता. २३ ः रेल्वे पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांना लेखी परीक्षा, मैदानी चाचणीतील गुण वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रेल्वे पोलिस दलात नियुक्त होता. हा गुन्हा दाखल होताच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मुख्य आरोपी सचिन राठोडसह नयन राठोड, चंद्रकांत राठोड आणि आरती जाधव यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. १९ एप्रिलला रेल्वे पोलिसांनी घाटकोपर येथे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली, तेव्हा सचिन याच्यावर भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती. कर्तव्यावर असताना त्याने काही उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीचे गुण वाढवून हमखास भरती करून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, निम्मी रक्कम लगेच तर उर्वरित रक्कम काम झाल्यावर द्यावी लागेल, असे सांगितले. त्याच्या प्रलोभनाला चार ते पाच उमेदवार बळी पडले; मात्र पैसे देऊनही भरती प्रक्रियेत निवड न झाल्याने या उमेदवारांनी पैशांसाठी तगादा लावला. पैसे परत न मिळाल्याने यातील एका उमेदवाराच्या वडिलांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.