पावसाळ्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज

पावसाळ्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज
Published on

पावसाळ्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज
३१ लाख ग्राहकांना अखंड वीजपुरवठा
मुंबई, ता. २४ : अदाणी इलेक्ट्रिसिटीने पावसाळ्यासाठी आपला आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम वाढीव स्तरानिशी सज्ज केला असून, त्यायोगे ३१ लाख वीजग्राहकांना अखंड वीजपुरवठा मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

अदाणी इलेक्ट्रिसिटीने मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्र उभारले आहे. येथून आपत्कालीन प्रतिसादाच्या प्रयत्नांवर नियंत्रण ठेवले जाईल. हे केंद्र २४ तास सुरू राहील. मोक्याच्या प्रमुख ठिकाणी, सात त्वरित प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडे पावसाळ्यात सर्व प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साधनसामग्री आहे. अतिवृष्टीमुळे वाढणाऱ्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी ९८ अत्याधुनिक पाणीपातळी मोजणी सेन्सर, नेहमी पूर येणाऱ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. ॲडव्हान्स डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट सिस्टीमशी हे सेन्सर जोडलेले असतील. त्यामुळे पूरसदृश स्थितीमुळे वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी येण्याच्या शक्यतांचा अंदाज आधीच बांधून त्यावर उपाय योजता येतील. अत्यावश्यक सामग्री, आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याची वाहने, डिझेल जनरेटर हे मोक्याच्या ठिकाणी सज्ज आहेत.

डिजिटल माध्यमांवर भर
अदाणी इलेक्ट्रिसिटीचे संकेतस्थळ वेबसाईट, मोबाईल ॲप आणि समाजमाध्यमांवर सद्यःस्थिती तपासण्यासाठी आणि मदतीसाठी संपर्क साधता येईल. मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्र, अत्याधुनिक उपग्रह आणि वायरलेस तंत्रज्ञान, तसेच वॉकी टॉकी आणि रिमोट उपकरणांच्या साह्याने वीज वितरण विभाग आणि अन्य प्रशासनाशी सतत संपर्कात राहील. या सुविधांमुळे वीजपुरवठा अखंड सुरू राहील आणि कोणत्याही प्रसंगात त्वरेने प्रतिसाद उपाययोजना केल्या जातील, याची खातरजमा होईल.

येथे मिळेल मदत
१९१२२ - २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन
९५९४५१९१२२ - व्हॉट्सॲप क्रमांक
०२२-५०५४९१११, ५०५४७२२५ - मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com