‘सीटीसी’कडून कायदेतज्ज्ञांचा गौरव

‘सीटीसी’कडून कायदेतज्ज्ञांचा गौरव
Published on

‘सीटीसी’कडून कायदेतज्ज्ञांचा गौरव
मुंबई, ता. २४ : कर, लेखा, कायदेशीर आणि संलग्न क्षेत्रांसाठी काम करणाऱ्या ‘द चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स’ (सीटीसी) या संस्थेने आपल्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून ‘शताब्दी मंथन’ या उपक्रमांतर्गत ‘मानद सदस्यत्व प्रदान सोहळा’ नुकताच आयोजित करण्यात होता.

‘नवीन कर संहिता’ या सत्राचे सूत्रसंचालन करणारे लेखापाल (सीए) अनिश ठाकर, ‘कोटक महिंद्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा आदींनी या वेळी आपले विचार मांडले. ‘सीटीसी’च्या यशस्वी १०० वर्षांच्या प्रवासाच्या या सांगता समारंभात कायदे आणि व्यावसायिक क्षेत्रातील निवडक नामवंत तज्ज्ञांच्या अनुकरणीय कार्याचा गौरव करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि माजी न्यायमूर्ती आर. व्ही. ईश्वर (निवृत्त), ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ सोपारकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ पर्सी पार्डीवाला यांचा समावेश होता. ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी या सोहळ्यात ऑनलाइन उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला. या सर्व दिग्गजांनी न्यायशास्त्र, घटनात्मक कायदा, करप्रणाली आणि कायदेशीर अभ्यास या क्षेत्रांत केलेल्या मोलाच्या कार्याचा भारतीय व्यावसायिक आणि न्यायिक क्षेत्रावर मोठा प्रभाव पडल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com