डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस

डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस
Published on

डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस

मुंबई, ता. २८ ः जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर म्युनिसिपल हॉस्पिटलमधील एका विभागप्रमुखांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर, रुग्णांच्या उपचारात हलगर्जी आणि महापालिका सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नोटिशीनुसार, संबंधित डॉक्टर ठरलेल्या ओपीडीच्या वेळेत अनुपस्थित राहत असल्याचा तसेच आयसीयू, ट्रॉमा आणि महिला-पुरुष वॉर्डमधील रुग्णांची नियमित तपासणी न केल्याचा आरोप आहे. गंभीर रुग्णांना आवश्यक उपचार न देता वेळेपूर्वी सामान्य वॉर्डमध्ये हलवण्याच्या सूचना दिल्याचेही नमूद आहे. मज्जासंस्था किंवा छातीच्या आजारांशी संबंधित गंभीर रुग्णांना दाखल न करण्याबाबत कनिष्ठ डॉक्टरांना सूचना दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्णालयीन कामकाजाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिस करून कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असतानाही आपत्कालीन कर्तव्य न बजावणे, डॉक्टरांचे रोस्टर व आपत्कालीन नियोजन न करणे आणि रुग्णांच्या नातेवाइकांना प्रकृतीची योग्य माहिती न देणे, असेही आरोप आहेत. याप्रकरणी कामकाजाच्या दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत उत्तर न दिल्यास एकतर्फी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

arrested in reason
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
The Pune Municipal Corporation has issued a show cause notice to the hospital while police are examining the complaint.
Authorities stated that teachers were required to remain present in schools despite students being granted a holiday due to heavy rainfall.
Marathi News Esakal
www.esakal.com