मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
Published on

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
लोकलसह एक्स्प्रेसवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३०) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार-ठाणेदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तसेच ठाणे-वाशी/नेरूळदरम्यानच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवांसह काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
...
मध्य रेल्वे
कुठे - विद्याविहार-ठाणेदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका
कधी - सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
परिणाम - या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. डाऊन मार्गाने जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येणार आहे. गोदान एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस, राजगीर-एलटीटी जनता एक्स्प्रेस, काकिनाडा पोर्ट-एलटीटी एक्स्प्रेस, बनारस-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसला विलंब होणार आहे.
...
ट्रान्स-हार्बर मार्गावर
कुठे - ठाणे-वाशी/नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्ग
कधी - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम - या ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ/पनवेलदरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लोकल सेवा बंद राहतील. ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या सेवा तर पनवेल, नेरूळ आणि वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा रद्द राहतील. दरम्यान, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com