लोकल विलंबाचा फटका

लोकल विलंबाचा फटका
Published on

लोकलच्या विलंबाने प्रवाशांची तारांबळ
रक्षाबंधनानिमित्त गर्दी; वेळापत्रकावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : रक्षाबंधनानिमित्त बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी प्रवासाला निघाल्याने शनिवारी मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलमध्ये प्रवाशांची वर्दळ वाढली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या पहाटे ३.१४ वाजताच्या १५ डब्यांच्या लोकलला विलंब झाल्याने पुढील फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसला.
या १५ डब्यांच्या लोकलच्या दिवसभरात एकूण १० फेऱ्या होतात. ही लोकल विलंबाने धावत असल्याने तिच्या पुढील फेऱ्यांनाही विलंब झाला. त्यामुळे मागून येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. परिणामी सकाळच्या वेळेत अनेक लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकलही पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि दादर या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. काही स्थानकांवर प्रवाशांना पुढील लोकलची प्रतीक्षा करावी लागली.
...
महिला डब्यांत अधिक गर्दी
रक्षाबंधनाच्या दिवशी नियमित कामकाज दिवसांच्या तुलनेत लोकलमधील एकूण प्रवाशांची संख्या कमी असली, तरी सणासाठी प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. मुंबई आणि उपनगरांतील बहिणी भावांच्या घरी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होत्या. त्यामुळे महिला डब्यांमध्ये तुलनेने अधिक गर्दी होती.
...
सुरक्षेत वाढ
गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था वाढविली होती. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त रक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच स्थानकांवरील गस्तही वाढविण्यात आली होती. मात्र लोकलच्या विलंबामुळे सकाळच्या प्रवासात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com