

जीएसटी अतिरिक्त आयुक्तासह तिघांना अटक
मुंबई, ता. २८ : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी (ता. २७) जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक केली. दगड खाणीच्या स्वामित्व धनासोबत जीएसटी रक्कम माफ करण्याच्या मोबदल्यात आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे तब्बल दीड कोटींची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४० लाख रुपये स्वीकारताच त्यांना अटक केल्याचे सीबीआय प्रवक्त्याने सांगितले.
अतिरिक्त आयुक्त विनयकुमार कंथेटी, अधीक्षक राकेशकुमार सिन्हा आणि नरिंदर राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. विनयकुमार आणि राजेशकुमार रायगड जिल्ह्यात नियुक्त होते. अटकेनंतर तिघांच्या कार्यालय, निवासस्थानी छापा घालण्यात आला. त्यात ४३ लाखांची रोकड आणि सुमारे ९० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती सीबीआय प्रवक्त्याने दिली. तक्रारदाराकडे दीड कोटी लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम ४० लाख अशी निश्चित केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआय अधिकाऱ्यांनी लगोलग गुन्हा नोंदवून २७ ऑगस्टला सापळा रचला. राजपूत या व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या वतीने ४० लाख रुपये स्वीकारले. रक्कम स्वीकारल्याचे अधिकाऱ्यांना कळवताच सीबीआय पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत विनयकुमार, सिन्हा यांची नावे पुढे येताच त्यांनाही अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.