प्रश्नपत्रिका फुटीचा तपास नंदुरबारात

प्रश्नपत्रिका फुटीचा तपास नंदुरबारात
Published on

प्रश्नपत्रिका फुटीचा तपास नंदुरबारात

मुंबई, ता. २८ : औषध निरीक्षकपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आरोपात अटक आरोपी प्रवीण पाटील याला सोबत घेऊन गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शुक्रवारी (ता. २८) नंदुरबार गाठत तपास सुरू केला. आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या संभाव्य प्रश्नांची विक्री, आर्थिक व्यवहार आणि अन्य संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाने पाटीलला नंदुरबारला नेल्याचे समजते.

पाटील संचालक असलेल्या कौटिल्य अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात असे, त्यामुळे त्याने शहादा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील यांची मुलगी ऋतुजा हिच्यासह अकॅडमीमधील विद्यार्थ्यांनाही पुरवला असावा, असा संशय गुन्हे शाखेला आहे. त्यातच त्याने परीक्षाकाळात (मार्च २०२६) वापरत असलेला मोबाईल फोन बिघडल्याची सबब देत नवा वापरता फोन जमा केला, त्यामुळे या संशयाला अधिक बळ मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी पाटील यास तपासासाठी त्याच्या निवासस्थानी, कौटिल्य अकॅडमीसह अन्य ठिकाणी नेण्यात आले. झाडाझडती घेत तपासाची संबंधित पुरावे गोळा करण्यात आले. या प्रकरणात मयूर ठाकरे या व्यक्तीचा शोध सुरू असून त्याच्या अटकेनंतर बऱ्याच प्रश्नांचा उलगडा होऊ शकेल, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com