

मुंबईकरांच्या खिशाला कात्री
‘पे अँड पार्क’ १० टक्क्यांनी महागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : शहरातील अपुऱ्या पार्किंग सुविधा आणि वाहतूक कोंडीच्या समस्येशी झुंजणाऱ्या वाहनचालकांना आता महापालिकेकडून आर्थिक फटका बसणार आहे. महापालिकेने शहरातील सार्वजनिक व रस्त्यांवरील पार्किंग शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शुल्कात कोणतीही वाढ न झाल्याने हा निर्णय घेण्यात येत असून, लवकरच पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
पार्किंग विभागाने सुरुवातीला तब्बल ४६.४० टक्के वाढीचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र एवढी मोठी वाढ नागरिकांवर लादणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पुढील दोन वर्षांसाठी ए, बी आणि सी श्रेणीतील पार्किंगसाठी केवळ १० टक्के शुल्कवाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत हा अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल. मुंबईत वाहनांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली असून, त्या तुलनेत पालिकेकडे सध्या ३७ सार्वजनिक (मल्टिलेव्हल) आणि ६७ रस्त्यांवरील ‘पे अँड पार्क’ची ठिकाणे उपलब्ध आहेत. २०१५ मध्ये व्यापक पार्किंग धोरण आणले गेले असले, तरी राजकीय विरोध आणि स्थगितीमुळे २०२२ पासून शुल्कात बदल झालेला नव्हता. आता पालिका प्रशासन बहुमजली यांत्रिक पार्किंगचा विस्तार करण्यासोबतच महसूल वाढीसाठी ही दरवाढ लागू करीत आहे. आगामी काही दिवसांत आयुक्तांची मंजुरी आणि स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे नवे दर मुंबईत लागू केले जातील. त्यामुळे मुंबईकरांना गाड्या पार्क करण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.