३५ टक्के कमी दराने पटवर्धन उद्यानाचे काम

३५ टक्के कमी दराने पटवर्धन उद्यानाचे काम
Published on

३५ टक्के कमी दराने पटवर्धन उद्यानाचे काम

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील ऐतिहासिक रावसाहेब पटवर्धन उद्यानाचा लवकरच कायापालट होणार आहे. महापालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागातील ३२ क्रमांकाच्या रस्त्यावरील या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी सुमारे पाच कोटी १० लाख ३२ हजार ५४० रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे; मात्र पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा थेट ३४.६६ टक्के इतक्या कमी दराने निविदा आल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवरून आणि अंदाजपत्रकाच्या सत्यतेवरून आगामी स्थायी समितीत विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

पटवर्धन उद्यानाच्या नूतनीकरणासाठी उद्यान विभागाने पाच कोटी २८ लाख एक हजार ५२० रुपयांचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले होते. या प्रक्रियेत सहभागी आठ कंत्राटदारांपैकी मे. एच अँड एच असोसिएट्स यांनी मूळ अंदाजापेक्षा ३४.६६ टक्के कमी दर भरल्याने त्यांची निवड झाली आहे. १८ टक्के जीएसटीसह अंतिम कंत्राट मूल्य चार कोटी २३ लाख ३९ हजार २९ रुपये निश्चित झाले असून, इतर वैधानिक आकारांसह एकूण खर्च ५.१० कोटींवर पोहोचतो. या कमी दरामुळे कामाचा दर्जा राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदार ३५ टक्के कमी दरात काम करीत असल्यास अभियंत्यांनी मुळात फुगवलेले अंदाजपत्रक तयार केले होते का किंवा कमी बजेटमुळे निकृष्ट दर्जाचे काम होईल का, यावर विरोधक सवाल उपस्थित करीत आहेत. यापूर्वीही पटवर्धन उद्यानातील पार्किंगवरून स्थानिकांनी रान उठवले होते. त्यामुळे या निविदेवरून आगामी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com