महापालिकेत ‘महायुती’त धुसफूस!

महापालिकेत ‘महायुती’त धुसफूस!
Published on

महापालिकेत ‘महायुती’त धुसफूस!
सुधार समितीच्या प्रस्तावावर ‘सर्जिकल स्ट्राइक’

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुधार समितीने सर्वपक्षीय सहमतीने मंजूर केलेल्या धोरणात्मक प्रस्तावाला महापालिका सभागृहात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ‘ब्रेक’ लावण्यात आल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी थेट गटनेत्यांकडे धाव घेत मोर्चा उघडला असून भाजपच्या या डावपेचांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
​​१८ ऑगस्टच्या सुधार समिती बैठकीत महापालिकेच्या विकासात्मक धोरणांसाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ची मदत घेण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव सर्व सदस्यांच्या मंजुरीने पार पडला होता; मात्र भाजपचा या प्रस्तावाला अंतर्गत विरोध असल्याने अध्यक्षा संध्या दोशी यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. भाजपने राजकीय वचपा काढत ‘प्रस्ताव क्रमांक २१’ अचानक तहकूब केला. अध्यक्षा सभागृहात हजर असताना, कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा चर्चा न करता महापौरांनी हा प्रस्ताव डावलून पुढील कामकाज सुरू केल्याने शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
​...
दखल घ्या!
​भाजपच्या या एकतर्फी कारवाईमुळे संतापलेल्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी गटनेत्यांना पत्र लिहून प्रशासकीय आणि राजकीय कोंडीवर बोट ठेवले आहे. सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झालेला विषय परस्पर तहकूब करणे म्हणजे थेट सुधार समितीच्या वैधानिक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. अध्यक्षांच्या अधिकारात किंवा विषयपत्रिकेत असा अचानक बदल करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना नियमांना केराची टोपली दाखवली गेली. या संपूर्ण प्रकरणाची दखल महापौर, सभागृह नेते आणि थेट दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावी, अशी आक्रमक मागणी दोशी यांनी केली आहे.
...
बचावात्मक पवित्रा
​सभागृह नेते गणेश खणकर यांनी मात्र या राजकीय नाट्यावर बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ‘शिवसेना (शिंदे गट) गटनेत्यांशी चर्चा करून मार्ग काढू,’ असे सांगत त्यांनी हे प्रकरण तापण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com