

एसटी बँकेच्या तीन फाइल्स गहाळ
गैरव्यवहार लपवण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ४० शाखांमधील अंतर्गत सजावट आणि फर्निचर दुरुस्तीच्या कामांसाठी काढलेल्या निविदांशी संबंधित तीन फाइल्स गहाळ झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. सुमारे २३ कोटी ९७ लाख रुपयांच्या कामांशी संबंधित कागदपत्रे गहाळ होणे गंभीर बाब असून, कथित गैरव्यवहार आणि अनियमितता लपविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बँकेच्या ४० शाखांमध्ये अंतर्गत सजावट आणि फर्निचर दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा क्रमांक १३/२५-२६ अंतर्गत प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदेशी संबंधित तीन फाइल्सपैकी एका फाईलमधील काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली आहेत, तर उर्वरित दोन फाइल्सच पूर्णपणे उपलब्ध नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
तीन कामांचे २३.९७ कोटींचे करार
या निविदा प्रक्रियेत अनुक्रमे १६ कोटी ७० लाख ८८ हजार रुपये, तीन कोटी ३४ लाख १७ हजार ६८५ रुपये आणि तीन कोटी ९१ लाख ७६ हजार रुपये अशा तीन कामांच्या करारांचे मूल्य असल्याचे बरगे यांनी सांगितले. या तिन्ही कामांची एकत्रित किंमत २३ कोटी ९६ लाख ८१ हजार ६८५ रुपये आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
फाइल्समधील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्यामागे केवळ प्रशासकीय निष्काळजी आहे की त्यामागे अन्य कारण आहे, याबाबतची चौकशी होणे आवश्यक असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळून निविदा प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कथित गैरव्यवहारासाठी जबाबदार व्यक्ती आढळल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशीही मागणी बरगे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.