कूपर रुग्णालयात बुरख्यावरून गैरसमज

कूपर रुग्णालयात बुरख्यावरून गैरसमज
Published on

कूपर रुग्णालयात बुरख्यावरून गैरसमज
सुरक्षा रक्षकाला कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर महापालिका रुग्णालयातील प्रसूतीनंतरच्या नवजात शिशूंच्या वॉर्डमध्ये भेट देण्यासाठी गेलेल्या एका महिलेला महिला सुरक्षा रक्षकाने कथितरीत्या पूर्ण बुरखा काढण्यास सांगितल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. या घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने संबंधित सुरक्षा रक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, महिलांना बुरखा पूर्णपणे काढण्याची आवश्यकता असल्याचा कोणताही नियम नसल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी स्पष्ट केले.
ही घटना ३० ऑगस्टला दुपारी सुमारे ४.१५ वाजता घडली. अ‍ॅड. जहानारा शेख या प्रसूतीनंतर ठेवले जाणाऱ्या वॉर्डमध्ये भेट देण्यासाठी गेल्या असता, प्रवेश देण्यापूर्वी महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना बुरखा पूर्णपणे काढण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले, की नवजात बाळांच्या विभागाच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर तपासणी केली जाते. सुरक्षा तपासणीदरम्यान संबंधित महिलेचा चेहरा ओळखीसाठी दाखविण्यास किंवा नकाब बाजूला करण्यास सांगणे अपेक्षित होते; मात्र सुरक्षा रक्षकाने बुरखा काढण्यास सांगितल्याने गैरसमज निर्माण झाला. कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी सांगितले, की संबंधित सुरक्षा रक्षकाने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत योग्य ती पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com