

महापालिकेत बदल्यांचे ‘रेट कार्ड’
भाजप आमदार मिहिर कोटेचा यांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊन बदल्या करण्यात आल्याचा दावा करीत भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी या बदल्यांचे ‘रेट कार्ड’च समोर आणले आहे. याप्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोटेचा यांच्या आरोपानुसार, तत्कालीन आयुक्तांनी २०२६ मध्ये १६५ अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द केल्या; मात्र त्यानंतर १५ मे २०२६ रोजी त्यातील ५० टक्के बदल्यांचा पुन्हा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला. यावर कोटेचा यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिल्यानंतर ही यादी रद्द झाली. असे असतानाही गेल्या दोन-तीन महिन्यांत झालेल्या बदल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून त्याचा ‘रेट कार्ड’च आपल्याकडे असल्याचा दावा कोटेचा यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी आमदार कोटेचा यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे विशिष्ट माहिती मागितली होती; मात्र २६ दिवस उलटूनही माहिती न दिल्याने यात मोठे गैरव्यवहार दडले असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप कोटेचा यांनी केला. त्यामुळे मुख्य सचिवांनी या प्रकरणाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.