न्यायाच्या आश्वासनानंतर डॉक्टरचा मृतदेह ताब्यात

न्यायाच्या आश्वासनानंतर डॉक्टरचा मृतदेह ताब्यात
Published on

न्यायाच्या आश्वासनानंतर डॉक्टरचा मृतदेह ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : आत्महत्या केलेल्या डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या आश्वासनानंतर बुधवारी (ता. २) सकाळी ६.४५ वाजता त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी याबाबत माहिती दिली.
डॉक्टरच्या मृतदेहाचे मंगळवारी सायंकाळपर्यंत सायन रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले होते; मात्र डॉक्टरच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. दरम्यान, सरकारकडून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला. केंद्रीय महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांवर मोठा दबाव होता. मंगळवारी रात्री सायन रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणावर लक्ष ठेवून पुढील पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
...
नुकसानभरपाईची मागणी
डॉक्टरच्या कुटुंबीयांनी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली आहे. डॉक्टरचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले असून, आज त्यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले होते. या घटनेनंतर तेथेही तणावाचे वातावरण कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com