

‘एसटी’च्या खर्चात बचत करा!
प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केवळ उत्पन्नवाढीवर भर न देता खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नावीन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. विशेषतः विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये सरनाईक बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही भूमिका मांडली. एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे या तिन्ही बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
...
शाश्वत मार्ग
‘एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर केवळ तिकीट दरवाढ हा पर्याय असू शकत नाही. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देत उत्पन्न वाढवणे आणि त्याच वेळी खर्च कमी करणे, हा शाश्वत मार्ग आहे,’ असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. विनावाहक बससेवेमुळे काही मार्गांवरील वाहकाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ही सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
...
प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवा!
एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्यासोबतच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासाची पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासी अभिमुख योजना राबवाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘प्रवासी समाधानी तर एसटीची आर्थिक गाडी रुळावर’ या दृष्टिकोनातून भविष्यातील योजनांची आखणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.