

चार आस्थापनांवर कारवाईचा बडगा
‘एफडीए’कडून दोघांचे परवाने निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईत खाद्यसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चार खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे.
तपासणीदरम्यान आढळून आलेल्या गंभीर त्रुटी तसेच त्यातून ग्राहकांच्या आरोग्याला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियम व विनियमांनुसार करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत गोरेगाव येथील इट क्लब आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स यांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत, तर चेंबूर येथील गुडलक बेकरी आणि अशफाक बेकरी यांच्याविरोधात परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
...
त्रुटी अशा
- गोरेगाव येथील रॉयल पाम्स परिसरातील इट क्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी व्यवस्था असल्याचे आढळले. तसेच हात धुण्याची सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळून आल्या. कीटक नियंत्रण व्यवस्थेत कमतरता, अपुरे वायुविजन तसेच खाद्य सुरक्षा प्रशिक्षण आणि त्यासंबंधीच्या नोंदींमध्येही अनियमितता आढळली.
- कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या तपासणीत मात्र अधिक गंभीर बाबी समोर आल्या. परिसरात उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, साचलेले पाणी, उघड्यावर ठेवलेले कच्चे मांस, खराब झालेल्या स्वयंपाकाच्या तेलाचा वापर तसेच खाद्यपदार्थांच्या तापमान नियंत्रणात गंभीर त्रुटी आढळून आल्या. या कारणांमुळे संबंधित आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
- चेंबूर येथील गुडलक बेकरीच्या तपासणीत खाद्यपदार्थांची साठवणूक, कीटक नियंत्रण, पाण्याची तपासणी, तापमान नियंत्रण, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि आवश्यक नोंदी ठेवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या आस्थापनाविरोधातही परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
- अशफाक बेकरीच्या तपासणीतही अनेक नियमांचे उल्लंघन आढळले. खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग, तापमान नियंत्रण, साठवणूक व्यवस्था, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच खाद्य सुरक्षा प्रशिक्षण या बाबींमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.