सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून सेवेत
Published on

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेस ही गुरुवारपासून (ता. ३) सुरू होत आहे. यामुळे कोकणवासीयांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १२.५० वाजता या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

उद्‍घाटनासाठी विशेष गाडी क्रमांक ०१००१ सीएसएमटीहून दुपारी १२.५० वाजता रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या २१ स्थानकांवर या गाडीला थांबा असेल. नोकरदार, व्यापारी तसेच नियमित मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. रात्रीच्या प्रवासामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. दरम्यान, सावंतवाडी, आंबोली, तारकर्ली तसेच गोवा सीमाभागातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिण कोकणातील पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला या सेवेमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच एलटीटी आणि दादरहून कोकणाकडे धावणाऱ्या अन्य गाड्यांवरील प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे.

नियमित वेळापत्रकाची प्रतीक्षा
उद्‍घाटनाच्या विशेष गाडीची वेळ मध्य रेल्वेने जाहीर केली आहे; मात्र नियमित दैनिक सेवेचे वेळापत्रक आणि इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नियमित प्रवासाचे नियोजन आणि आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना मध्य रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com