

स्वतःचा प्लांट बंद करून कंत्राटदाराचे खिसे भरले!
मुंबई, ता. २ : पावसाळ्यात मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी बाहेरील कंत्राटदाराकडून २.३६ कोटी रुपयांचे ९०० मेट्रिक टन कोल्ड मिक्स खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार रणकंदन झाले. वरळी येथील पालिकेचा स्वतःचा प्लांट बंद करून खासगी कंत्राटदाराचे खिसे भरले जात असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी केला.
मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी वरळीचा प्लांट बंद करून मित्तल नावाच्या कंत्राटदाराला मदत केली जात आहे. अटी-शर्ती न तपासता परप्रांतीय कंत्राटदारांना पाठीशी घातले जात असून, मराठी कंत्राटदारांवर अन्याय होत आहे, असा घणाघात केला. काँग्रेसचे अशरफ आजमी आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) डॉ. सईदा खान यांनीही रस्त्यांच्या हजारो कोटींच्या कामांनंतरही पुन्हा खड्ड्यांवर उधळपट्टी कशासाठी, असा सवाल करीत प्रशासनाला धारेवर धरले. अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी वरळी येथील प्लांट जुना व क्षमता संपलेला होता, असे सांगितले. विरोधकांचे आरोप फेटाळताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्हणाले, की विरोधकांकडून ‘झूट की गूंज’ सुरू आहे. प्लांटची जागा विकलेली नसून ती भाड्याने दिली आहे. गदारोळातच अखेर मित्तल पेट्रो फार्मा केम कंपनीचा २.३६ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.