पालिकेतील बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली लागू

पालिकेतील बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली लागू
Published on

पालिकेतील बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली लागू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. नगर अभियंता कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांसाठी ‘यादृच्छिकीकरणावर आधारित कर्मचारी बदली प्रणाली’ ही ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मंत्री, आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींच्या राजकीय शिफारशींचा उल्लेख असल्याचा खुलासा केला होता. या प्रकरणामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने ऑनलाइन आणि संगणकीय रँडमायझेशनवर आधारित प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने बुधवारी (ता. २) काढलेल्या परिपत्रकानुसार, एकाच खाते किंवा विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेल्या संबंधित अभियंत्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. कर्मचाऱ्यांना बदलीसाठी प्राधान्यक्रमही ऑनलाइन नोंदविता येणार आहे; मात्र प्राधान्यक्रम दिल्याने बदलीची हमी मिळणार नसून प्रशासकीय आवश्यकता आणि उपलब्ध पदांचा विचार केला जाणार आहे. दरवर्षी एकूण कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश असून, बदलीची प्रक्रिया १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान करण्याचे परिपत्रकात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com