

मणिपाल पेमेंटचा ८०५ कोटींचा आयपीओ
मुंबई, ता. ४ : डेबिट-क्रेडिट कार्ड, चेकबुक, पेमेंट रिंग, किचेन, बेल्ट, आधार व निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फास्टॅग, होलोग्राम आणि टॅक्स स्टॅम्प आदी उत्पादने तयार करणाऱ्या मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन्सचा आयपीओ ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान खुला होणार आहे. आयपीओसाठी ३२२ ते ३३९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
सुमारे ८०५ कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये किमान ४४ शेअरसाठी अर्ज करावा लागेल. त्यापुढे ४४ शेअरच्या पटीत अर्ज करता येणार आहे. यातील ७५ टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक गौतम पै यांनी दिली.
कंपनीचा क्रेडिट कार्ड निर्मितीमध्ये ३६ टक्के, तर डेबिट कार्ड निर्मितीमध्ये ३१ टक्के बाजारवाटा आहे. आतापर्यंत कंपनीने सात कोटी २६ लाख डेबिट कार्ड तयार केली आहेत. तसेच सरकारसाठी एक अब्ज आधार कार्ड तयार केल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे १५ देशांमध्ये ३४४ ग्राहक आहेत. स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया यांसह १२ सरकारी बँका, २२ खासगी बँका आणि ६०१ फिनटेक व पेमेंट कंपन्या ग्राहकांमध्ये आहेत. एटीएम, चेक भरणा, रोख रक्कम भरणे आणि काढणे यांसाठी कंपनीने देशभरात पाच हजार बूथ उभारले आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल १,३२६ कोटी रुपये, तर करोत्तर नफा २५३ कोटी रुपये होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.